मैत्र होतं तुझं माझं, अगदी ओळखीचं,
तूच कारण होतं माझ्या रोजच्या हसण्याचं.
आता फक्त आठवणींत तुझा चेहरा दिसतो,
डोळे मिटले की, त्या सावलीत जीव माझा फसतो.
तू गेलीस तरी, काळजात एक हुरहूर दाटते,
मैत्रीच्या पलीकडे, तुझी आठवण मला जास्त वाटते.
राहून राहून आता, फक्त तुझाच भास होतो,
माझ्या निशब्द जगात, तूच माझा श्वास होतो.
0 comments:
Post a Comment